fbpx

कार्यकर्त्यांचे वाद टाळण्यासाठी भाजप – शिवसेनेची ‘टास्क फोर्स’, हे नेते राखणार समन्वय

मुंबई: भाजप – शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील अंतर्गत वाद टाळत समन्वय साधण्यासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

गेली साडेचार वर्ष शिवसेना भाजप नेते एकमेकांवर टीका करताना पहायला मिळाले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येत युतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही पक्षांचे जागावाटप आणि उमेदवार देखील निश्चित झाले आहेत. गामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 जागांवर तर भाजपा 25 जागांवर लढणार आहे.

दरम्यान, मागील साडेचार वर्षात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण झालेली दरी दूर करण्यासाठी राज्यभरात सहा ठिकाणी संयुक्तिक मेळावे घेतले जाणार आहेत. अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये हे मेळावे पार पडतील.

भाजप – शिवसेना लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयक

नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, रामटेक, बुलडाणा, अकोला, वाशिम-यवतमाळ, वर्धा, अमरावती.
भाजप – चंद्रशेखर बावनकुळे
शिवसेना – दीपक सावंत

औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी,नांदेड, जालना.
भाजप – पंकजा मुंडे
शिवसेना – अर्जुन खोतकर

अहमदनगर, शिर्डी, धुळे, नंदुरबार, , नाशिक, दिंडोरी, रावेर, जळगांव.
भाजप – गिरीश महाजन
शिवसेना – दादा भुसे

कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सांगली. 
भाजप – चंद्रकांत पाटील
शिवसेना – नितीन बानगुडे पाटील

सोलापूर, माढा, मावळ, पुणे, बारामती, शिरुर.
भाजप – गिरीश बापट
शिवसेना – नीलम गोऱ्हे

पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे.
भाजप – रविंद चव्हाण
शिवसेना – एकनाथ शिंदे

मावळ, रायगड, सिंधुदुर्ग-रत्नागिरी.
भाजप – रवींद्र चव्हाण
शिवसेना – सुभाष देसाई