भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माझी हत्या करेल ; जिग्नेश मेवाणी

mewani

अहमदाबाद: विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडीया यांनी मला एन्काऊन्टरमध्ये मारण्याचा कट रचला असल्याचा अप्रत्यक्ष आरोप भाजप वर केला होता. त्यांच्यापाठोपाठ वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनीही आरोप करत म्हटलंय की मलाही प्रवीण तोगडीया यांच्याप्रमाणे भीती वाटतेय की माझी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हत्या करेल. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखतीमध्ये जिग्नेश मेवाणी यांनी स्पष्ट केलं.

तोगडिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत. माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता असा धक्कादायक आरोप मोदी सरकारवर केला आहे. जुन्या खटल्यांचा हवाला देऊन माझा एन्काऊंटर करण्याचा कट, मात्र मी घाबरणार नाही, हिंदूंचा आवाज उठवणारच असे तोगडिया यांनी स्पष्ट केले होते. अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शुद्धीवर आल्यानंतर पत्रकार परिषद होती.

त्यापाठोपाठ आता मेवाणींनीही हा मुद्दा उचलून धरला आणि आपल्या जीवालाही धोका असल्याचं म्हटलंय. त्यांच्या समर्थकांनी गुजरातमधल्या वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मेवाणींना वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था देण्यात यावी अशी मागणी केली आहे.