#महाराष्ट्रद्रोहीBJP विरुद्ध #MaharashtraBachao जाणून घ्या ट्वीटर वॉर मध्ये कुणी मारली बाजी

1Political_Party flag

मुंबई : ठाकरे सरकारविरोधात भाजपने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असं म्हणत ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा दिला आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन आंदोलन केले.

भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाच्या विरोधात महाविकास आघाडीचेही कार्यकर्ते जोमाने पुढे आले अन सुरू झाला तो जोरदार संघर्ष…. पण सोशल मीडियावर. मिम्स, मजकुराची डिझाईन असलेल्या पोस्ट, फोटो आदींद्वारे फेसबुक, ट्विटवर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगल्याचे शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे सोशल मीडियावर राजकीय वातावरण तापल्याचे जाणवले.

ट्विटरवरही भाजपा समर्थक आणि महाविकास आघाडीचे समर्थक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळत आहे. यावरुनच आता ट्विटवर दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये हॅशटॅग युद्ध सुरु झालं आहे. महाविकास आघाडीमधील पक्षांनी #महाराष्ट्रद्रोहीBJP हा हॅशटग वापरुन ट्वीट केले आहेत. तर भाजपाच्या समर्थकांनी #MaharashtraBachao हा हॅशटॅग वापरुन ट्वीट केल्याचे पाहायला मिळाले.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी (२२ मे २०२०) दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत #महाराष्ट्रद्रोहीBJP या हॅशटॅगवर ८२ हजाराहून अधिक लोकांनी ट्वीट केले तर #MaharashtraBachao हॅशटॅग वापरुन ४० हजार जाणांनी आपली मत ट्विटरवर व्यक्त केल्याचे ट्विटवरील ट्रेण्डींग टॉपिकमधून स्पष्ट होतं आहे.