मुंबई: ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. मात्र ठाकरे सरकारने त्यांचा अजूनही राजीनामा घेतलेला नाहीये, याविरोधातच गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. आज पुन्हा विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने आंदोलन करत नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
यावेळी ‘राजीनामा दो, राजीनामा दो नवाब मलिक राजीनामा दो’ अशा घोषणाही देण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी भाजपने आझाद मैदानात भव्य मोर्चा देखील काढला होता. मात्र मविआ सरकारने अजून तरी मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे भाजप सतत आंदोलन करत आपली भूमिका कायम ठेवत आहे.
दरम्यान राज्यात सध्या ईडी कारवायामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. ईडीचा ताफा थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे. ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वीर सावरकर’ यांच्या बायोपिकमध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत
- दिपाली सय्यद यांची मोठी घोषणा! महिला कुस्तीगिरांनाही मिळणार महाराष्ट्र केसरी होण्याचा मान
- PAK vs AUS: असे काय झाले की शाहीन वॉर्नरचे फोटो होताय व्हायरल; VIDEO पाहाच!
- “सत्तेच्या माध्यमातून टोल कलेक्शन”- जयदत्त क्षीरसागर
- “मनोहर जोशींना एक न्याय तर ठाकरेंना दुसरा न्याय का?”- नितेश राणे