ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक, सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न

uddhav thackeray

सोलापूर – राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपने राज्यसरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून आज अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. सोलापुरात देखील आज भाजपच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती यावेळी भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

या आंदोलनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी मधे हस्तक्षेप करत हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या झटापटीत या पुतळ्याच्या चिंध्या झाल्या. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वात सोलापूरमध्ये आंदोलन सुरू असताना ही घटना घडली.

दुसऱ्या बाजूला नागपुरातील मानेवाडा चौकात आंदोलन करत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या दिला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ओबीसींचं आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना आणि परवानगी न घेता केलेल्या या आंदोलनामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

महत्त्वाच्या बातम्या