fbpx

बंगालमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप; आता हिंदुत्ववादी मतांची विभागणी होत नाही का?

टीम महाराष्ट्र देशा – भाजप आणि शिवसेनेने लोकसभा – विधानसभा निवडणुकीसाठी युती केली असली, तरी पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना भाजप विरोधात स्वबळावर लढणार आहे. राज्यातील ४८ जागांवर शिवसेना भाजपने युती केली असली तरी बंगाल मधील १५ जागांवर शिवसेना स्वबळावर लढणार आहे

२०१६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं १८ जागा लढवल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याची शिवसेनेची पहिलीच वेळ आहे नाही. विशेष म्हणजे शिवसेना ज्या जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्या सर्व जागांवर हिंदू उमेदवारच दिले जाणार आहेत.

चार साडेचार वर्ष शिवसेनेन भाजप वरती टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. राम मंदिर असो किंवा हिदुत्वाच्या मुद्याशी निगडीत सर्व विषयांवर सेनेनं भाजपवर शरसंधान करून घायाळ केल होत. मात्र अचानक हिंदुत्वाच्या मुख्य मुद्य्याला अधोरेखित करत  हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात एकत्र आले.

amit-shah-uddhav

बंगालमध्ये सेनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महराष्ट्रात ज्या मुद्यावरून युती झाली तो मुद्दा बंगालमध्ये लक्षात का घेण्यात आला नाही. असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. तसेच सेना भाजप महाराष्ट्रात वेगळे लढले तर हिंदुत्ववादी मतांची विभागणी होईल अशी भीती सेनेने व्यक्त केली होती. मग आता  भाजप विरोधात बंगाल मध्ये लढताना हिंदुत्वादी मतांची विभागणी होणार नाही का असा सवाल सोशल मिडीयावर उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमित शाहांच्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यास उपस्थित राहणार आहेत. एकेकाळी अमित शाह यांची तुलना अफजलखानाशी करणारे उद्धव ठाकरे चक्क अमित शहा यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः गुजरातला जाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेची ही दुटप्पी भूमिकाही समोर येत आहे.

1 Comment

Click here to post a comment