मुंबई: मुंबईच्या मालाड भागामध्ये एक खेळाचे मैदान आहे. या मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या मैदानाचे उद्घाटन कॉंग्रेस नेते अस्लम शेख (Aslam Sheikh) यांच्या हस्ते त्या मैदानाकाहे उद्घाटन होणार आहे. या मैदानाला टिपू सुलतानचे (Tipu Sultan) नाव आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या नावावरून राजकारण सुरू झाले आहे. भाजप आणि कॉंग्रेसमध्ये या नावावरून नवीन वाद सुरू झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून टिपू सुलतानच्या नावाने अनेकवेळा राजकारण करण्यात आले आहे. तसेच या नावाला भाजप विरोध करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील याला विरोध करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले आहेत, तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं नाव ही महानगरपालिकेने मैदानाला देणं हे अतिशय अयोग्य आहे, त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
या प्रकरणी कॉंग्रेसचं असं म्हणणं आहे की या मैदानाला टिपू सुलतान हे नाव आधी पासूनच आहे. आता फक्त या मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे आणि त्यामुळे याचे उद्घाटन करण्यात येत आहे, असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच कॉंग्रेस नेते अस्लम शेख म्हणाले की, या नावाला भाजप आताच का विरोध करत आहे. हे नाव आधी पासून आहे मग आधी का विरोध केला नाही. या मागे भाजपचे राजकारण आहे, असा आरोप अस्लम शेख यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
प्रसिद्ध तबलावादक अनिंदो चटर्जी यांचाही पद्मश्रीस नकार; म्हणाले, हा पुरस्कार आधीच…
‘या’ बडया सेलिब्रिटींनी रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या ‘पुष्पा’ला नाकारले
आदित्य ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना दुरूनच जोडले हात; ताफ्यातही मिळाली नाही एंट्री…!