सायकलसमोरील बटण दाबण्याच्या सूचना करणाऱ्या कर्मचाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी दिला चोप

टीम महाराष्ट्र देशा- मुरादाबादमधील बूथ क्रमांक २३१ मध्ये तैनात असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्याने मतदारांना समाजवादी पक्षाचे चिन्ह असलेल्या सायकलसमोरील बटण दाबण्याच्या सूचना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी हा प्रकार भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले आणि पोलिस, निवडणूक अधिकाऱ्यांसमक्ष चोप दिला.

दरम्यान,एका बाजूला हा प्रकार घडत असताना ईव्हीएममधून फक्त भाजपालाच मत जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रामपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आहेत. मतदान यंत्रात बिघाडाशिवाय प्रक्रिया पार पडायला हवी अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे तसेच ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप देखील अखिलेश यादव यांनी केला आहे.Loading…
Loading...