चिकन खाऊन राहुल गांधी मंदिरात गेल्याचा भाजपचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा-  कर्नाटक निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे तसे आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली आहे . कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येदियुरप्पा यांनी ट्वीट करून राहुल गांधी हे जवारी चिकन खाऊन नरसिम्हा स्वामी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते असा आरोप केला आहे. राहुल गांधी हे इलेक्शन हिन्दू असल्याचा आरोप केला आहे त्याच बरोबर कॉंग्रेस हिंदूंच्या भावनांना धक्का पोहचवण्याच काम करत असल्याचं देखील म्हटलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
11 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी कोप्पल जिल्ह्यातील कनकागिरी येथील कनकचला नरसिम्हा स्वामी मंदिरात गेले होते. राहुल गांधी दुपारचं जेवण करून मंदिरात गेले होते . कर्नाटक प्रदेश बीजेपी अध्यक्ष येदियुरप्पा यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्थानिक कन्नड भाषिक टेब्लॉयड ‘शूधि मूला’ मध्ये छापलेल्या बातमीचा आधार घेत राहुल गांधी यांनी मांसाहार करून देवदर्शन घेतल्याचा येदियुरप्पा यांनी आरोप केला आहे.

राहुल गांधींच्या कर्नाटक दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत असणारे कॉंग्रेस नेते रिज़वान अरशद यांनी या सगळ्या आरोपांना निराधार म्हटलं आहे तसेच सर्व आरोप फेटाळून लावले . स्थानिक आमदार शिवराज तन्गरगी यांनी खास शाकाहारी जेवणाची व्यवस्था केली होती, कुणीही मेन्यू काय होता हे माहिती करून घेऊ शकत असं त्यांनी म्हटलं आहे.