Nana Patole । मुंबई : देशात सध्या महागाईचा प्रमाण वाढत चाललं आहे. याच महागाईवरून केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. दिल्लीत आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होत.
यानंतर आता आंदोलनानंतर गांधी भवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसने देशभर आंदोलन करत असताना दिल्लीत राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना पोलिसांनी दंडेलशाही करत ताब्यात घेतले. प्रियंका गांधी यांना पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत आक्षेपार्ह व निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष भाजपा सरकारच्या या पोलीसी दंडेलशाहीचा निषेध करत आहे. लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न मांडणे गुन्हा नाही. पण नरेंद्र मोदींचे सरकार लोकशाही मानत नसून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. ईडी सरकारने दंडेलशाहीच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पण अशा कारवायांना आम्ही घाबरत नाही, जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू, असं पटोले म्हणाले.
दरम्यान, यावेळी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतलं हे आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू केली आहे. पुढे काँग्रेस नेते अशोक चव्हाण, संजय निरुपम माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, अस्लम शेख, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांनाहि पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- 5G Internet and Smartphones | 5G इंटरनेट होतंय लॉंच; पहा कोणते आहेत पॉकेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन्स
- Rahul Narvekar । “पिठासीन अधिकारी म्हणून… “; शिंदे – ठाकरे यांच्यातील संघर्षावर नार्वेकरांच मोठं विधान
- Ravindra Jadeja | CSK वर रवींद्र जडेजाची नाराजी वाढली? इन्स्टा पोस्टनंतर ट्विट हटवले
- Congress। भाई जगतापांना पोलिसांनी ताब्यात घेताना अक्षरश: फरफटत नेले
- Sanjay raut | “बाळासाहेब म्हणायचे, रडायचं नाही, लढायचं…”; संजय राऊतांनी पाठवलं पत्र
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<