‘धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबूब शेख हे परप्रांतीय आहेत का?’, भाजपचा खोचक सवाल

मुंबई: साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे राज्यातील परप्रांतीयांची नोंद होणार आहे. याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला आदेश दिले आहेत. दरम्यान यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.

‘परप्रांतियांची नोंद ठेवा’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यांनी दिले आहेत. हा निर्णय म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. ठाकरे सरकारने परप्रांतीयासंबंधी हा निर्णय घेतला, पण बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्याबद्दल आश्चर्यकारक मौन बाळगलेय. तर महिला शोषणाचा आरोप असलेले ठाकरे सरकारचे मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री संजय राठोड, मेहबूब शेख हे परप्रांतीय आहेत? असा खोचक सवाल करणारा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री संजय राठोड,मेहबूब शेख यांच्यावर महिला अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते, यावरूनच भाजपने ठाकरे सरकारवर निशाना साधत टोला लगावला आहे. दरम्यान माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही. अशा नराधमांना वचक बसवा, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी महिला व बालकांच्या सुरक्षेकरता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांना आता इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल. जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या