fbpx

सोलापूर लोकसभा : भाजप-शिवसेना खांद्याला खांदा लावून काम करणार – प्रा. अशोक निंबर्गी

सोलापूर : युती झाल्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोघेही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विजयासाठी खांद्याला खांदा लावून महास्वामींच्या विजयासाठी असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी यांनी सांगितले.

भाजपकडून महास्वामींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुपारी प्रा.अशोक निंबर्गी आणि विक्रम देशमुख यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्या राधाश्री या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी  सोलापूर लोकसभेविषयी चर्चा केली त्यानंतर ते  याविषयी माध्यमांशी बोलत होते.

प्रा. निंबर्गी म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख तसेच विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी सोलापूरचा विकास केला आहे. त्यामुळे विरोधकांचा सोलापूरचा विकास झाला नाही असा आरोप चुकीचा आहे. याउलट विरोधकांनी काय केले त्यांनी सांगावे असे ते म्हणाले. मित्रपक्षातील प्रमुख सहकारी असलेले सेनेचे जिल्हाप्रमुख कोठे यांची भेट घेतली. कोठे यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.  शिवाय महापालिकेतील पेंडिंग विषय मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष व आठवले गटाचे कार्यकर्ते प्रामाणिक काम करून भाजपचा उमेदवार निवडून देतील असेही ते यावेळी म्हणाले.