सोलापूर जिल्ह्यातील माढा विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांचे बेताल वक्तव्य
करमाळ्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देता न आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी पत्रकारांवर सुपारी घेतल्याचा आरोप करत बेताल वक्तव्य केले आहे. करमाळयात शिवसंपर्क अभियानावेळी शिवसंपर्क अभियान माढा लोकसभा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ हे आले असताना त्यांना पत्रकारांनी जिल्हाप्रमुख पदासाठी करमाळयातून भरपूर जण सध्या इच्छुक आहेत. बदलाचे वारे चालू आहे.
अशी चर्चा सुरू आहे असा प्रश्न विचारला असता अनिल कोकीळ यांच्या बाजूला उभे असलेले धनंजय डिकोळे पत्रकाराला म्हणाले, सुपारी घेऊन आला व्हय इथं,व्हय कुणाची सुपारी आणली असा आरोप केलाय.असे वक्तव्य केल्याने करमाळा पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –