वाढदिवस विशेष : पंकजाताई यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व हे सिंहासारखे

संघर्षाची यशो गाथा पंकजाताई मुंडे

संघर्ष म्हणजे काय ? संघर्षाची नवी व्याख्या म्हणजे पंकजाताई गोपीनाथराव मुंडे….

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय क्षेत्रात पदार्पण करणारी संघर्षकन्या म्हणजे पंकजाताई…

ज्या वेळेस राज्यातील मातब्बर नेते मंडळी सत्तेच्या लालसे पोटी आदरणीय मुंडे साहेबांना सोडून इतरत्र जात होती. त्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन वाड्या,वस्ती,तांड्या वर गल्लो-गल्ली पक्षाचे विचार पोहचवणारी आणि सगळ्यांना पुरून उरणारी आधुनिक झाशीची राणी म्हणजे पंकजाताई…

नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने। विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता॥

जसे की, वनराज सिंहाला वनामध्ये कोणीही राज्याभिषेक करत नाही तर तो स्वतःच स्वपराक्रमाने राजा बनतो.तद्वतच नामदार पंकजाताई यांचे कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध झाले आहे.

स्व.गोपीनाथराव मुंडे व स्व.प्रमोद महाजन साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन पुन्हा एकदा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आपल्या पराक्रमाच्या जोरावर महाराष्ट्रातील भ्रष्टवादी आणि कॉग्रेसचे शासन उलथवून टाकणारी वीरांगना म्हणजे पंकजाताई…

मुंडे साहेबांच्या निधनानंतर कुटुंबियांचे, महाराष्ट्रातील मुंडे समर्थकांचे व विशेषतः बीड जिल्ह्याचे व ऊसतोड मजुरांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या मातृहृदयी कुटुंबवत्सल नेतृत्व म्हणजे पंकजाताई…

अध्यक्षा भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र ,वैद्यनाथ साखर कारखान्याचे चेअरमन ते थेट महिलाबालविकास व ग्रामविकास खात्याचा मंत्री होण्याचा मान मिळवणाऱ्या कणखर नेत्या म्हणजे पंकजाताई….

भीती न आम्हा कोणाची ह्या वज्रमुठींनी कातड भेदु !!
सीमा न कुठली हुंकार असा गगनाला छेदू !!
ठाम निश्चय हा दुर्दम्य आमुची इच्छाशक्ती !!
हृदय पोलादी ना सोडी कधी राष्ट्रभक्ती !!

सदरील काव्यपंक्ती प्रमाणे एक स्वयंसेविका म्हणून स्वाभाविक असणारे प्रखर राष्ट्रभक्ती, निस्वार्थभाव,संघटन कौशल्य,कठोर परिश्रम हे गुण ताईंच्या स्वभावात दिसून येतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,स्वा.विनायक दामोदर सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर,राष्ट्रसंत गाडगेबाबा या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी दिनी त्यांच्या अभिवादन सभेस आवर्जून असलेली त्यांची उपस्थिती व तिरंगा एकता रॅलीचे आयोजन हे त्यांच्या प्रखर राष्ट्रभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होय.

महाराष्ट्रातील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा ते पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी पर्यंत विराट जनसमुदायाच्या साक्षीने काढलेली अविस्मरणीय संघर्ष यात्रा. या यात्रेत जवळजवळ 3000 किलोमीटरचा अविश्रांत प्रवास करून,21 जिल्हे,79 विधानसभा मतदार संघ त्यांनी पिंजून काढले. यावेळी 200 ठिकाणी यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले,600 पेक्षा जास्त गावात मा. ताईंनी जनसंवाद केला,65 भव्यदिव्य सभा घेतल्या या वरून आपणास त्यांच्या कार्यकुशलतेचा आवाका लक्षात येतो. महाराष्ट्रात विविध निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभा,प्रचार फेऱ्या,रोड-शो यातून संघटन कौशल्य व त्यामागील कठोर परिश्रम लक्षात येते.

ग्रामविकास व महिला बालविकास खात्याच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध योजना, यामध्ये रिअल टाईम माँनिटरींग उपक्रमाअंतर्गत राज्यभर पोषण अभियान,केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना प्रभावी पणे राबवणे,माझी कन्या भाग्यश्री योजना, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला उद्योजकता मेळावा,अंधारातून प्रकाशाकडे योजना,सरपंचाच्या मानधनात वाढ,अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ,एक शेतकरी एक रोहित्री या योजनांचा समावेश आवर्जून करावा लागेल.

या मध्ये मुख्यत्वे जि.प.शिक्षक ऑनलाईन बदली प्रणाली,गावठाण जमाबंदी प्रकल्प व अतिक्रमणे नियमना कुल करण्याची ऑनलाईन प्रणाली या योजना प्रभावी पणे राज्यामध्ये राबवून त्या सामाजिक क्रांतीच्या प्रनेत्या बनल्या व त्यांच्या या विशेष कार्याची दखल घेऊन यंदाचा बिजनेस वर्ल्ड या नामांकित संस्थेच्यावतीने दिला जाणारा मानाचा असा डिजिटल इंडिया पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास खात्यास मिळाला यावरून आपणास त्यांच्या ठायी असणारी दूरदृष्टी, प्रशासकीय कार्यकुशलता लक्षात येते.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर,सर्व धर्मीय समुदायिक विवाह सोहळा, मोतीबिंदू मुक्त जिल्हा,ग्रामीण भागातील तरुणाईसाठी आयोजित रोजगार मेळावा एवढेच काय भारत मातेच्या वीर सुपुत्रांच्या कुटुंबीयांच्यासाठी Bharat ke veer या नावाने सुरू केलेली चळवळ या वरून ताई संवेदनशील मनाच्या समाजसुधारक आहेत हे आपणास स्पष्ट होते.

ताईंच्या समाजाभिमुख कार्यपद्धतीची व त्यांच्या लोकप्रियतेची राज्यातील विविध वृत्तवाहिन्यांनी व अग्रणी वृत्तपत्रांनी आपल्या विशेष कार्यक्रमात,विशेष पुरवणीमध्ये वेळोवेळी दखल घेतलेली आहे.मग यामध्ये BBC NEWS चा राष्ट्र-महाराष्ट्र कार्यक्रम, ZEE 24 तासच्या मुक्तचर्चा कार्यक्रमातील मुलाखत,TV9 मराठी वृत्तवाहिनीवरील न्यूज रूम स्ट्राईक या कार्यक्रमातील मुलाखत, NEWS 18 वरील महाराष्ट्र कन्यारत्न मालिकेतील विशेषभाग बघितल्यास आपल्या लक्षात येते.

बलउपासनेचे महत्व समाजामध्ये निर्माण व्हावे म्हणून अलीकडच्याच काळात International Yoga Day चे औचित्य
साधून The Children’s AID Society Mumbai येथील निरीक्षणगृह,बालगृह येथील मुलींसोबत योगा करून शरीर संवर्धनाचा दिलेला मूलमंत्र तसेच वृक्षरोपण वृक्षसंवर्धन मोहीमेच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दिलेला संदेश आम्हा तरुणाईला मोलाचा आहे.

बीड जिल्हाच्या हद्दीत येऊन ठेपलेली रेल्वे,जिल्ह्याच्या हाद्दीतून गेलेले राष्ट्रीय महामार्ग,जिल्हा परिषदेची होत असलेली भव्य इमारत,प्रत्येक गावा मध्ये ग्रामसंसद यावरून आपणास ताईंच्या ठायी असणार विकसनशील भाव लक्षात येतो मी तर एवढेच म्हणेल की पंकजाताई म्हणजे गतिशील विचारांच्या कृतीशील नेत्या…

Politics is a game of scoundrals म्हणजेच राजकारण हा भ्रष्टाचारी व गुंड लोकांचा खेळ आहे हे पाश्चात्य राजकारणात देखील म्हंटल्या जाते विशेषतः गेल्या पंधरावर्षातील देशातील व महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या मध्ये याच वर्णनाचे दर्शन सर्व दूर होत राहीले.पण आदरणीय ताईंनी राज्याच्या,जिल्ह्याच्या राजकारणा मध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली सुजाण, सुशिक्षित,सुसंस्कृत,तरुण चेहऱ्यांना आणून ही व्याख्या बदलायचे काम केले आहे.

माझा आणि ताईंचा अलीकडच्याच काळातील परिचय त्यांची प्रशासनावरील जरब,कणखर प्रशासकाच्या भूमिकेतून कामे करून घेण्याची हातोटी, करारी बाणा या गोष्टी मनाला भावल्या आणि हा तर त्यांचा सहजभाव आहे.

चरैवेती, चरैवेती…
यही तो मंत्र है अपना ।
नही रूकना नही थकना
यही तो शुभंकर मंत्र है अपना ।

या परम ध्येयाने राष्ट्रनिर्माणासाठी अविरत कार्यकरणाऱ्या,राज्याच्या राजकीय पटलावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंचावणाऱ्या स्वाभिमानी आणि कणखर नेतृत्व म्हणजेच नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा आज वाढदिवस कायम जनसेवेचे व्रत अंगिकारलेल्या रणरागिणीस या शब्द रुपी शुभेच्छा…..

लेखक :अँड.अजिंक्य राजेंद्र पांडव
अध्यक्ष वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठाण बीड तथा जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा बीड.
मो.9049080808