मराठमोळी सोनाली आहे पंजाबी कुटुंबाची सून

aag sonali bendre

टीम महाराष्ट्र देशा : 1 जानेवारी 1975ला मुंबईत मराठी कुटुंबात जन्मलेल्या सोनाली बेंद्रेने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. सोनालीने अभिनेत्री म्हणून 1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘आग’ सिनेमातून पदार्पण केले होते.

aag sonali bendreहा सिनेमा फ्लॉप झाला, परंतु सोनालीला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टारर सिनेमांत काम केले.

sonali bendreसोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही तरी तिने जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान (इंग्लिश बाबू देशी मेम), सलमान खान (हम साथ साथ है) आमिर खान (सरफरोश), अमिताभ बच्चन (मेजर साहब), अजय देवगण (दिलजले, जख्म) आणि अक्षय कुमार (तराजू) या सिनेमांचा उल्लेख करावा लागेल.

sonali and salman sharukhसोनालीने 2002 मध्ये निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले. लग्नानंतर मराठमोळी सोनाली पंजाबी कुटुंबाची सून झाली. Sonali Bindre and husband Goldie Behl

2005 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव रणवीर आहे.
सोनाली बेंद्रेसोनालीने आपल्या 11 वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास 30 सिनेमे केले. शिवाय तिने, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी सिनेमांतसुध्दा काम केले आहे. 2003 मध्ये रिलीज झालेल्या ‘कल हो ना हो’ सिनेमानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. दहा वर्षानंतर 2013 मध्ये रिलीज झालेल्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ सिनेमातून सोनालीने कमबॅक केले.sonali bendre in once upon a time in mumbaai dobaraकमबॅक केल्यानंतर सोनालीने छोट्या पडद्यावर एंट्री केली. तिने ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ शोमध्ये जजची भूमिका केली. त्यानंतर ‘आजीब दास्ता है ये’ या डेली सोपमध्येही तिने काम केले होते.india's best dramebaaz sonali bendre

सोनाली बेंद्रे