fbpx

आज अश्या अभेनेत्याचा बर्थडे आहे,ज्याच्या एका वक्तव्यामुळे देशभरात माजली होती खळबळ

Aamir-Khan-helps-victims-of-Bihar-flood

टीम महाराष्ट्र देशा : आज अशा एका सिनेअभिनेत्याचा वाढदिवस आहे,  ज्याच्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. त्याचं नाव आहे मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान.

‘आपल्याला या देशात असुरक्षित वाटत आहे. मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे, त्यामुळे त्याने हा देश सोडून दुसऱ्या देश्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.’ तसेच हा सल्ला मला माझी बायको किरण रावने दिल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर तिच्यावरही विविध क्षेत्रातून टीका करण्यात आली होती.

आमिरच्या या विधानामुळे देशभरातून त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली  होती. अनेक लोकांनी त्याच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला होता. तर, बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनीही आपण आमीर खानशी सहमत नसल्याच म्हटले होते.

शिवसेनेनं देखील  त्याच्यावर कठोर शब्दात  टीका केली होती. अमीर खानला देश सोडायचा आहे तर त्याने त्वरीत पाकिस्तानात जावे, आजवर जनतेने त्याला डोक्यावर घेतले. मात्र, आता आम्हाला कळले आम्ही सापाला दूध पाजले, असे शिवसेनेने म्हटलं होतं

अमिर करोडो देशवासियांचा आवडता अभिनेता आहे त्याने आपल्या कृतीतून देशवासियांच्या मनात स्थान मिळवले आहे. मात्र, त्याच अमिरने हे वक्तव्य केले यावर विश्वास बसत नाही असं भाजपतर्फे बोलण्यात आल होत.

एआयएमआयएमचे नेते असदूद्दीन ओवेसी यांनीही अमिर खानवर टीका केली होती . अमिर खान निरर्थक बडबड करत आहे मी खूप दंगली पहिल्या परंतु मी कधीही अशा प्रकारचे वक्तव्य करू शकत नाही.  कारण मी भारतात राहतो त्याची बडबड आम्ही खपवून घेवू शकत नाही असं ते म्हणाले होते.

चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी हिंदूंची संख्या सर्वाधिक असलेल्या देशात तीन मुसलमान सुपरस्टार आहेत, हाच सर्वात मोठा पुरावा आहे की, देश असहिष्णू नाही, अश्या आशयाच ट्विट त्यांनी केल होतं.

जेष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी अमिर खानची बाजू घेतली होती. अमिर खान हा देशाचा नागरिक आहे. त्याला देशातील घडामोडीबाबत भाष्य करण्याचा अधिकार आहे. त्याच्या मताचा आदर करूया. त्याला उलट प्रश्न करण्यापेक्षा त्याला काय चुकीचे जाणवले हे विचारले पाहिजे असे रजा मुराद यांनी म्हटले होते.

1 Comment

Click here to post a comment