fbpx

वैभवराजे जगताप : सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला कणखर युवक नेता

‘नेतृत्व ‘ हे सहज घडत नसते कि घडवले जात असते. ‘नेतृत्व’ सिध्द करण्यासाठी अथक परिश्रम घेवून इतरांसाठी झगडावे लागते.दिवस -रात्रीची तमा न बाळगता स्वतःला जन- सामान्यांच्या कल्याणार्थ, समाजातील गोर-गरिब जनतेसोबत राहून त्यांचे सुख -दु :ख वाटून घेवून, त्यांच्यात रमून त्यांना आपल्यातील च एक आहे अशी आपूलकिची भावना निर्माण करुन ज्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्या जनमाणसांवर पडतो तोच आजच्या कलयुगात आपलं ‘नेतृत्व ‘ जनतेच्या ह्रदयात कोरत असतो.अगदी असच करमाळा तालुक्यात एक उमलतं करारी नेतृत्व गेल्या २०१२ पासून जनतेसमोर फुलायला लागलेलं दिसून येतं ते म्हणजे करमाळा नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष वैभवराजे जगताप.

या नेतृत्वाला जरी राजकिय घराण्याचा वारसा आहे असे जरी वाटत असले तरी पिताश्री मा.आ. जयवंतराव जगताप यांनी वैभवराजे यांना अगोदर स्वतःला सिध्द करायला लावले आहे. देशभक्त कै.नामदेवराव जगताप यांच्या कडून जयंवतराव उर्फ भाऊ यांना राजकारण व समाजकारणाचं बाळकडू मिळालं. भाऊंनी नामदेवराव साहेबांच्या निधनानंतर तालुक्याची धुरा अगदी यशस्वीपणे सांभाळली आहे. अनेक सहकारी संस्था,सेवाभावी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक, करमाळा तालुका खरेदी – विक्री संघ, करमाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, करमाळा नगर परिषद, आदिनाथ सहकारी साखर कारखाना , महाराष्ट्र राज्य सहकारी बाजार समिती अशा अनेक संस्था पारदर्शकपणे प्रगतीपथावर नेल्या आहेत. आजपर्यंत भाऊंनी अनेकांना विवीध ठिकाणी प्रतिनिधीत्वाच्या संधी देवून अनेकांना मोठे केले.पण असं म्हणतात ‘लोकांची स्मरणशक्ती छोटी असते ‘ ( people have short memory). लोक केलेले उपकार लवकर विसरतात. स्वार्था पोटी या जवळच्या लोकांनी भाऊंना धोका दिला हे सत्य सर्वश्रूत आहे.राजकारणात चढ – उतार असतातच. राजकारण व समाजकारण करत असताना ‘टिमवर्क ‘ असावे लागते. अन् यामध्ये जिवाभावाची, रक्ताची नाती असलेली माणसे असावी लागतात. सध्या भाऊंना राजकारणात ‘ सांघिक काम ‘ करताना वैभवराजेंच्या रूपाने मोठा आधार तयार झाला आहे.

एकट्याने काम करताना ज्या मर्यादा यायच्या त्याची पोकळी आता वैभवराजेंच्या रूपाने भरुन निघाली आहे. सामान्य जनता अन् भाऊ यांच्यामधला ‘दुवा ‘ म्हणून सध्या वैभव राजेंची वाटचाल चालु आहे. असं म्हणतात ‘माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवाव लागत नसतं’ अगदी तसच हे प्रगल्भ नेतृत्व जनतेसमोर ,तालुक्याच्या राजकिय पटलावर घडत आहे. या नेत्यातला सर्वात चांगला गुण म्हणजे सर्वात मिळून- मिसळून राहणे होय.हा नेता कधीच गटा-तटाचे राजकारण करत नाही. त्यामूळे प्रत्येकाला हा नेता आपलासा वाटतो. जिज्ञासू वृत्ती, अप्रतिम स्मरणशक्ती अन् जबर इच्छाशक्ती असलेल्या या व्यक्तिमत्त्वात खरच एक खूप मोठं नेतृत्व पेलण्याची धमक आहे. लहानपणापासून भाऊंच्या सावलीत वाढत असताना अख्या तालुक्याची माहिती झाली, जनतेच्या ओळखी झाल्या.

भाऊंकडून लहानपणापासून राजकारणाचे अन् समाजकारणाचे धडे मिळाले. २०१२ -१३ पासून काही सवंगड्यांना सोबत घेवून पिताश्री भाऊंच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होवून संघटनात्मक काम सुरू केले.त्या नंतर करमाळा तालुका खरेदी -विक्री संघाच्या चेअरमन पदाची जबाबदारी भाऊंनी त्यांना दिली. करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटी चे विश्वस्त म्हणून म.गांधी शैक्षणिक संकुलास शिस्ती बाबत तालुक्यात एक मॉडेल बनवले. निस्वार्थपणे अनेक सामाजिक लोकोपयोगी कामे केली. दुष्काळात जनता होरपळलेली असताना त्यांना जनावरांना चारा वाटून, खेडोपाडी पाण्याच्या टाक्या वाटून,सार्वजनिक ठिकाणी लोकांना बसण्या साठी बाकं देवुन विधायक कामाचा ठसा उमटवला. शासनाच्या अनेक अन्यायकारक धोरणांचा व योजनांचा धिक्कार युवक काँग्रेस च्या माध्यमातुन विवीध प्रकारे आंदोलने, निवेदने देवुन रस्त्यावर उतरून केला.शेतकरी मोर्चात सहभागी होवून शेतकऱ्यांना आपलंसं वाटायला भाग पाडलं .जनतेच्या सदैव अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेला युवक नेता दुसरा तालुक्यात कोणीही नाही.

शहर स्वच्छतेचा विडा उचलुन, कोणत्याही पदावर नसताना पहाटे पासून रात्री उशीरापर्यंत स्वतः शहरातील गटारं हातात फावडं घेवून गाळ मुक्त केली.नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेवून त्यांना प्रोत्साहन देवून शहर स्वच्छ बनवलं. शहरातील जनतेला स्वच्छतेबाबत आवाहन केलं अन् एक ‘स्वच्छता दूत ‘ म्हणून ओळख निर्माण केली. या सर्व . कामाची पोहोच पावती म्हणजे जनतेने गेल्या २०१६ मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला व भाऊंनी जनतेच्या आग्रहास्तव नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची जबाबदारी दिली. शहराचा चेहरा बदलण्याची धमक या युवक नेत्यात आहे हे जनतेने बरोबर हेरले अन् थेट जनतेमधून निवडून दिले. विशेष म्हणजे करमाळा नगर परिषदेला ऐतिहासीक पार्श्वभूमी आहे.सध्या या नगरपालिकेचे शतकोत्तर सुर्वण महोत्सवी वर्ष चालु आहे. अन् याच काळात एक नवा इतिहास घडविण्याची जबाबदारी युवा नगराध्यक्ष वैभवराजे सध्या पेलत आहेत. स्वच्छ , स्मार्ट शहराची व्हीजन समोर ठेवून शहराचा चेहरा -मोहरा बदलुन एक आदर्श शहर राज्यात एक मॉडेल शहर म्हणून ओळखलं जावं यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. याच कामाच्या माध्यमातून एक धडाडीचं व्यक्तिमत्व तालुक्यात उमलत असून युवा वर्गासंह बुजूर्ग मंडळीना सुद्धा आपलंसं वाटू लागलं आहे.विवीध उपक्रम राबवत आहेत. जनतेच्या हिताच्या विवीध शासकिय योजना राबवत आहेत. अशीच गरूडझेप कायम रहावी असे मनापासून वाटते.

– प्रा. भागडे दत्तात्रय