या युवकान आपल्या वाढदिवसाला काय केलं की सर्वत्र होतय त्याच कौतुक

वाढदिवस म्हणजे केक , फटाके, पार्ट्या अस जणू समीकरणच बनलंय मात्र करमाळा तालुक्यातील जेऊर परिसरात एक असा वाढदिवस साजरा केला गेला आहे ज्याच सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या सचिन निमगिरे यांनी आपल्या वाढदिवसावर होणार अनावश्यक खर्च टाळून महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधून वाढदिवस साजरा केला. सैराट या सिनेमामुळे चर्चेत आलेल्या या  गावात महिलांच्या शौचालयाचा मोठा प्रश्न होता .विशेषत जेऊरच्या बस स्थानकात सार्वजनिक शौचालयाची अवस्था बिकट होती. सचिन निमगिरे आणि त्यांचे सहकारी आनंद मोरे यांनी याबाबत परिवहन महामंडळाकडे पाठपुरावठा केला मात्र , महामंडळाकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळालं नाही. शेवटी स्वखर्चातूनच महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला .नुकतेच सचिनच्या वाढदिवसाच्या दिवशी या स्तुत्य उपक्रमाचे भूमिपूजन झाले. या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केल्या गेलेल्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.