Birthaday Special : मुंबई इंडियन्स ते टीम इंडियात स्थान; अवघ्या काही महिन्यातचं पालटलं सुर्याचं नशीब

surya

मुंबई :  ८ सप्टेंबर रोजी भारतीय क्रिकेट मंडळाने ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली. विश्वचषक संघात यावेळी मोठे बदल दिसून आले आहे. टी 20 साठी निवडलेल्या संघात काही खेळाडूंना प्रथमच संधी देण्यात आली आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या आयसीसीच्या या मेगा इव्हेंटसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघात अशा सात खेळाडूंना स्थान दिले आहे, जे पहिल्यांदा टी -20 विश्वचषकात खेळतील. यावेळीभारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनी टी -20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समावेश केला आहे. ज्यामध्ये धुरंदर फलंदाज सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे.

गेल्यावर्षी २६ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. या संघात स्थान न मिळाल्याने सुर्यकुमार यादव पुरता खचला होता. यानंतर त्याने दोन दिवसातच आयपीएलमध्ये आरसीबी संघाविरुद्ध ४३ चेंडुत ७९ धावांची नाबाद खेळी करत आपण भारतीय संघासाठी पात्र आहोत हे सिद्ध करुन दाखवले. यानंतर त्याच्या कामगीरीच्या सहाय्याने मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२०चे जेतेपद पटकावले. त्याच्या या कामगिरीची दखल घेत यावर्षी झालेल्या मार्च महिन्यातील इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिकेत त्याला भारतीय संघातून पदार्पणाची संधी देण्यात आली.

पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. मात्र याच मालिकेतील पुढील सामन्यात संधी मिळताच त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलाच चेंडु खेळताना जोफ्रा आर्चरला षटकार लगावत धडाकेबाज पदार्पण केले. या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावत सामनाविराचा पुरस्कार पटकावला. तर १८ जुलै रोजी एकदिवसीय पदार्पण केल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावले.

पहिल्याच एकदिवसीय मालिकेत त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याला आता इंग्लंड दौऱ्यातील कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासुन भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाची जागा तो भरुन काढेल अशी अपेक्षा क्रिकेट रसिकांना आहे.

महत्वाच्या बातम्या