या आहेत देशातील पहिल्या महिला बाल कलाकार; ज्यांचा आज जन्मदिवस आहे

२० व्या शतकात भारतामध्ये चित्रपट श्रुष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याकाळी आपल्या समाजामध्ये प्रबोधानाचे मुख्य साधन होते ते संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, या गोष्टी खऱ्या अर्थाने समाजामध्ये करमणुकीचे आणि प्रबोधनाची माध्यमे होत्या. मात्र चित्रपट असो वा नाटक त्याकाळी मोठी उणीव जाणवायची ती स्त्रियांच्या पात्रांची. अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी त्याकाळी स्त्रिया पुढे येत नव्हत्या. त्यामुळे स्त्री भुमिकाही पुरुष साकारत होते.

दादासाहेब फाळके

१९१३ साली चित्रपट युग सुरु झाले ते राजा हरिश्चंद्र चित्रपटापासून. या बोलपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळकेंचा मोहिनी भस्मासुर या मुकपटाचा प्रयोग सुरु झाला होता. आपल्या बोलपटांमध्ये स्त्री पात्र हे स्त्री कलाकारांनी साकारावीत यासाठी दादासाहेब फाळके आग्रही होते. त्याच वेळी कमला कामत नावाच्या लहान मुलीचं नाव त्यांना सुचवण्यात आल.

राजा हरीश्चंद्र

कमला कामात याचं संपूर्ण कुटुंबच कला क्षेत्राशी निगडीत होते. वडील कीर्तनकार तर आई सतारवादन करायच्या. घरची परिस्थिती बेताची असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. आणि याच माध्यमातून त्यांनी संवाद,संगीत आणि अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे याचाच फायदा त्यांना मूकपट तसेच संगीत नाटकांतील अभिनयासाठी झाला.

कलाबाई कामात-गोखले

दादासाहेब फाळकेंच्या मोहिनी भस्मासुर या मुकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंची निवड करण्यात आली. आणि पुढे कमलाबाईच्या रुपाने चित्रपट श्रुष्टीला एक स्त्री अभिनेत्रीचा चेहरा मिळाला. कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांनी या मूकपटात पार्वतीच्या छोट्या भूमिकेच काम केल. कमलाबाईनी साकारलेल्या भूमिकेचं सर्व स्तरातून स्वागत झालं आणि पुढे  दिवसेदिवस त्यांचा अभिनयाची कमान वाढतच गेली.

तब्बल २०० पेक्षा ही अधिक नाटकं, मुकपट त्यासोबतच कारकिर्दीत ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून नायिका तसेच स्त्रीप्रधान भूमिकांमुळे कमलाबाई गोखले कायमच लक्षात राहतात. आज कमलाबाई यांचा जन्मदिवस या निमित्ताने ‘महाराष्ट्र देशा’च्या वतीने विनम्र अभिवादन

 

 

You might also like
Comments
Loading...