औरंगाबाद :देशात आणि राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरगाव झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मृतावस्थेत पक्षी आढळून येत आहेत. बुधवारी सकाळी औरंगाबाद येथील हिमायतबाग परिसरातील खाम नदीच्या शेजारी किंगफिशर पक्षी मृतावस्थेत आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
सजग नागरिक व पक्षीमित्र चंद्रशेखर बोर्डे यांनी त्या मृत पक्षाला खडकेश्वर येथील पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे दाखल केले. याचे नमूने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यावर बर्ड फ्लू बाबत खात्री होईल, असे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, मराठवाडा हे बर्ड फ्लूचे केंद्र बनले असून, या विभागात आतापर्यंत दोन हजार ५६ कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला आहे. त्यामुळे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष्यांच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.
राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथे ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या जिल्ह्यातील कुपटा येथे ५००, तर बनवस येथे १६० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी येथे ३५०, तर सुकणी येथे ८० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला आहे. वंजारवाडी येथेही ५५ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील चिंचोर्डी येथे १११ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या
- सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट; चर्चेला उधाण
- आज पुन्हा इंधनदरवाढ मुंबईत पेट्रोलने केली नव्वदीपार !
- ‘मुस्लिम चार विवाह करतात मग धनंजय मुंडेंनी दोन केले तर काय बिघडलं?’
- कोरोना लसीकरणाची मनपाकडून जय्यत तयारी
- कोरोनाच्या ६० हजार लसी औरंगाबादेत दाखल, चार जिल्ह्यांचा साठा उतरवला