fbpx

महाभारत काळातही अस्तित्वात होते इंटरनेट, त्रिपुराचे मुख्यमंत्री सोशल मिडीयावर झाले ट्रोल

त्रिपुरा: गुवाहाटीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला त्रिपुरामधील भाजपचे तरूण मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी संबोधित केले. त्यावेळी ‘महाभारत काळात इंटरनेट अस्तित्वात होते आणि त्याकाळातील लोक इंटरनेटचा वापर करत होते,’ असा दावा त्यांनी केला आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.दरम्यान मुख्यमंत्री विप्लव देव यांचा जावईशोध सोशल मिडीयावर चांगलाच ट्रोल  होत आहे.

महाभारत काळापासून इंटरनेट होते असा दावा त्यांनी केला. एवढेच नाही तर महाभारताच्या काळात तांत्रिक सुविधाही उपलब्ध होत्या. महाभारतात जे युद्ध झाले ते संजयने धृतराष्ट्राला सांगितले. संजय हे डोळ्यांनी युद्ध पाहू शकले कारण त्याला इंटरनेट कारणीभूत आहे असे देब यांनी म्हटले आहे. इंटरनेट आणि सॅटेलाइट महाभारत काळापासून होते हेच संजय यांच्या दिव्यदृष्टीमागचे कारण होते असेही देब यांनी म्हटले आहे.