जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे आहे : रावत

Bipin Rawat

टीम महाराष्ट्र देशा- पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, आम्ही एक अण्वस्त्र संपन्न देश असून कायम युद्धासाठी तयार आहोत. पण दोन्ही देशांच्या नागरिकांच्या हितासाठी आम्ही शांततेचा मार्ग निवडला आहे. मात्र या शांततेच्या आवाहनाला कोणीही आमचा कमकुवतपणा समजू नये, अशा शब्दांमध्ये गफूर यांनी इशारा दिला आहे.यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीमेवर भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केल्यानंतर आता पाकिस्तानी लष्कराकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. यानंतर भारतानं न्यूयॉर्कमध्ये होणारी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी स्वागत केलं.

शनिवारी भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त करताना दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. संवाद आणि दहशतवाद एकाचवेळी होऊ शकत नाही, असं रावत म्हणाले होते. ‘आमच्या सरकारचं धोरण अतिशय स्पष्ट आहे. पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया रोखाव्यात. पाकिस्तानकडून अतिशय निर्घृणपणे जम्मू काश्मीरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे,’ असं रावत यांनी म्हटलं आहे.

पाकला अण्वस्त्रांची खुमखुमी, अण्वस्त्र हल्ला काय असतो ते दाखवून देण्याची धमकीLoading…
Loading...