Share

Bipasha Basu Baby | आई झाल्यानंतर बिपाशाने केली पहिली पोस्ट, लेकीचं ठेवलं ‘हे’ नाव

टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर (Karan Singh Grover) आज आई-वडील झाले आहेत. बिपाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण अनेक दिवसांपासून या आनंदाच्या बातमीची वाट बघत होते. अखेर या दोघांच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाचा आनंद त्यांना मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये बिपाशा आणि करणने आपल्या गर्भधारणेची घोषणा केली होती. त्याचबरोबर बिपाशा आणि तिचे बेबी बंपचे फोटो देखील शेअर केले होते.

बिपाशा बासूने (Bipasha Basu) ठेवले ‘हे’ लेकीचे नाव

अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण ग्रोवर सिंग यांनी लग्नाच्या सहा वर्षानंतर आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. दरम्यान, बिपाशाने सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर करत आपल्या लेकीचे नाव देखील जाहीर केले आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टनुसार, बिपाशा आणि करण यांनी आपल्या लेकीचे नाव ‘देवी’ ठेवले आहे. या पोस्टसोबत बिपाशाने तिच्या बाळाचा एक फोटो देखील इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. या पोस्टला तिने कॅप्शन दिले आहे, “तुमच्या प्रेमाचे आणि देवीच्या आशीर्वादाचे प्रत्यक्ष रूप इथे आहे. तिचे रूप फार सुंदर आहे.”

बिपाशाने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर चाहत्यांकडून देखील बिपाशा आणि करणच्या बाळाला चाहत्यांकडून देखील भरपूर प्रेम मिळत आहे.

अलोन चित्रपटाच्या वेळी बिपाशा आणि करण यांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. करण ग्रोवरचं बिपाशा सोबतच हे तिसरं लग्न असून आज हे दोघं पालक झाले आहे. लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर बिपाशा ने आज एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर (Karan Singh Grover) आज आई-वडील …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now