Share

Bipasha Basu | गोल्डन ड्रेस परिधान करून बिपाशा बासूने केले सुपर स्टायलिश मॅटरनिटी फोटोशूट

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर (Karan Singh Grover) लवकरच आई-वडील होणार आहेत. बिपाशा बसू हिने तिच्या मॅटरनिटी शूट (Maternity Photoshoot) चे फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. या आधीही बिपाशा ने तिच्या मॅटरनिटी शूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले होते. सध्या तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोजना सुद्धा चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बिपाशा बासूचा (Bipasha Basu) मॅटरनिटी फोटोशूट

बिपाशा बासू हिने 4 नोव्हेंबर रोजी तिचे नवीन फोटोशूट इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे, ” स्वतःवर नेहमी प्रेम करा आणि ज्या शरीरात तुम्ही राहता त्यावर प्रेम करा.” या फोटोशूट दरम्यान तिने कट-आउटसह गोल्डन गाऊन परिधान केला आहे. तिने या लुक साठी लाइट मेकअप केलेला असून लिपस्टिक आणि मॅचिंग कानातले परिधान केलेले आहे.

फोटोशूट दरम्यान, बेबी बंप फ्लॉन्ट करताना बिपाशा दिसत आहे. या आधी देखील बीपशाने तिचा एक फोटोचा शेअर केला होता. ज्या मध्ये तीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेले होते. त्या फोटोला तिने कॅप्शन दिले होते, “लवकरच आई होणार आहे.” ऑगस्ट महिन्यामध्ये बिपाशा बासू आणि करन्सी ग्रोवर यांनी आपल्या आई-वडील होण्याची घोषणा इंस्टाग्राम द्वारे केली होती.

ऑगस्टमध्ये शेअर केलेल्या त्या पोस्टला या जोडप्याने कॅप्शन दिले होते, “एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा आणि एक नवीन आशेची किरण. आम्हाला परिपूर्ण बनवणार त्यामुळे लवकरच दोनाचे तीन होणार आहोत.”

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर त्यांच्या अलोन या चित्रपटाच्या दरम्यान सेटवर प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांनी एप्रिल 2016 मध्ये लग्न केले. आणि आता लवकरच बिपाशा आणि करण आई-वडील होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर (Karan Singh Grover) लवकरच आई-वडील होणार आहेत. …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now