‘ग्राहक सेवा केंद्रामध्ये बॉयोमॅट्रिक प्रणाली बंद असल्यामूळे एटीएम कार्डचा वापर करावा’

तुळजापूर : शासन आदेशानुसार प्रधान मंत्री जनधन योजनेंतर्गत उघडलेल्या महिलांच्या खात्यामध्ये प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत रु ५००/- जमा करण्यात येत आहेत. हे पैसे काढण्यासाठी महिला खातेदारांना 3 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंतचा वेळ दिलेला असून प्रत्येक निर्धारित दिवशी बँक खात्याचा शेवटचा क्रमांक दर्शवलेल्या खातेदारांनी त्या तारखेस बँक शाखेत, ग्राहक सेवा केंद्रात अथवा ATM मध्ये येऊन पैसे काढावेत असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

ज्यांचा खात्याचा शेवटचा क्रमांक खाली दिलेल्या तारखेसमोर दाखविलेला आहे फक्त त्याच महिला खातेदारांनी त्या तारखेस शाखेत/ ग्राहक सेवा केंद्र / ATM मध्ये यावे-फक्त ज्या ताराखेसमोर जे खाते क्रमांक आहेत त्याच महिलांनी पैसे काढण्याकरिता बँक/ग्राहक सेवा केंद्र/ Atm* मध्ये येऊन सहयोग करावा जेणे करून शासनास आणि आपणास सहकार्य करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मदत होईल. कोरोना व्हायरस प्रतिबंध नियमांचे पालन करावे. स्वतः आणि दुसऱ्यामध्ये १ मीटर अंतर ठेवावे. तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा,असे शासनामार्फत करण्यात येत आहे.

दर्शिवलेल्या तारखेला जे लाभार्थी येणार नाहीत त्यांना १५ एप्रिल २०२० नंतर पण ATM/ग्राहक सेवा केंद्र/ बँक शाखेत येऊन पैसे काढता येतील, असेही प्रशासनाने कळविले आहे.