पुणे : सर्वांच्या आवडीचे अस्सल भारतीय खाद्यपदार्थ जेव्हा तीच पारंपरिक चव घेऊन नेहमीपेक्षा वेगळ्या आणि सोयीस्कर स्वरूपात समोर येतात तेव्हा त्याचा आस्वाद घेण्याची मजाच काही और असते. असेच दोन लोकप्रिय भारतीय पदार्थ एक वेगळाच ट्विस्ट घेऊन “बिंज बार” या नावाने लवकरच सगळ्यांसमोर येत आहेत.
भेळ आणि चिवडा हे सर्वदूर आढळणारे पदार्थ भारतीय खाद्य संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. या पदार्थांभोवती अनेकांच्या आठवणी बांधल्या आहेत तसेच प्रत्येक प्रदेशात भेळ आणि चिवडा बनविण्याची स्वतःची अशी खास वेगळी पद्धत आहे. या लोकप्रिय व पूर्णपणे अस्सल भारतीय पदार्थांचा आस्वाद आबालवृद्धांसह संपूर्ण कुटुंब नेहमीच घेत असतात.
सर्वांची हीच आवड लक्षात घेऊन, तीच पारंपरिक चव कायम ठेवत “बिंज बार” हे नवीन उत्पादन लवकरच सादर करण्यात येणार आहे. या नवीन उत्पादनात भेळ आणि चिवडा हे आता त्यांच्या नेहमीच्या स्वरूपापेक्षा वेगळे म्हणजेच “बार” स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. नेहमीचेच घटक वापरून व तीच चव कायम ठेवत नवीन रूप धारण केलेले हे पॅकेज्ड “बार” आपण कुठेही, कधीही नेऊ शकतो आणि सहज उघडून खाऊ शकतो. हे चमचमीत पदार्थ एकच खाऊन थांबता नाही तर आपण ते एका मागे एक खात राहतो, म्हणेच ‘बिंज ईट’ करतो. म्हणूनच “बिंज बार” ला “एक और” अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.
कुठलेही ऍडेड प्रिझर्व्हेटिव्हज, कलर्स किंवा फ्लेव्हर्स नसलेले तसेच ग्लुटेन आणि ट्रान्स फॅट फ्री असलेले हे “बार” सध्या हे लाईट चिवडा, भेळ बार आणि लेमन भेळ या 3 स्वादात संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करण्यात येणार आहेत, या बरोबरच आणखी काही नवीन स्वाद सुद्धा लवकरच खाद्यप्रेमींसाठी आणण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- उद्यापासून पुढील ४ दिवस पुण्यात धो-धो; तर कोकणातही ऑरेंज अलर्ट
- ‘काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष, सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा, ‘ शहराध्यक्षांचे आवाहन!
- शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला म्हणणारे पाटील आता म्हणाले, ‘युतीचा विचारही होऊ शकतो’
- ‘…तर संजय राऊतांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो’; चंद्रकांतदादांचा राऊतांना चिमटा
- ‘भैय्याला दिली ओसरी भैय्या हातपाय पसरी ; परप्रांतीयांना आरक्षण दिले तर याद राखा, गाठ मनसेशी’