बीडच्या निवडणूक विभागात अधिकाऱ्यांकडून कोट्यावधींचा अपहार

टीम महाराष्ट्र देशा – बीडच्या निवडणूक विभागाने केलेल्या वारेमाप खर्चाची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात होत आहे. बीड विभागाकडून केलेल्या संशयित खर्चाची आठवड्याभरात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी पाच जणांच्या समितीला दिले असून, समितीला २४ जानेवारीपर्यंत चौकशी पूर्ण करायची आहे.

बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांन हाताशी धरून निवडणूक निधीचा अपहार केला असल्याचा आरोप होत आहे. या खर्चाचे आकडे पाहून सामान्य माणूस चक्रावून जाण्याची स्थिती आहे . उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी उभारलेल्या मंडपाचे बिल तब्बल ९ कोटी रुपये आकारण्यात आले . तर मतदारांच्या जनजागृती आणि बॅनरसाठी ५५  लाखांचा खर्च दाखवण्यात आला आहे.

Loading...

स्टेशनरी समान जसे की  स्टॅपलर, स्टॅपलरच्या पिना, फाईल, दोऱ्या या छोट्या खरेदीतही ५० लाख रुपयांचा खर्च झाल्याचे समोर आले आहे.  या प्रकरणात निवडणूक आयोगाचे अप्पर सचिवांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी पाच अधिकाऱ्यांचे एक पथक चौकशीसाठी नियुक्त केले आहे. समितीला २४ जानेवारीपर्यंत स्वत:च्या अहवाल अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...