लग्नाच्या २७ वर्षांनंतर बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी घेतला घटस्फोट

bill gates

वॉशिंग्टन : प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेतलाय. याबाबत त्यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी मागील २७ वर्षे सोबत प्रवास केला. आता वेगळे होत असल्याचं सांगितले आहे. त्यांनी यावेळी विभक्त होण्याचं कारणही यात त्यांनी सांगितलं आहे. आपण दोघेही नव्या जीवनाला सुरुवात करत असल्याचं यात त्यांनी म्हटलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, ‘की भरपूर चर्चा आणि आमच्या नात्याबाबत विचार केल्यानंतर आम्ही दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षात आमच्या तीन मुलांचं संगोपन करुन त्यांना मोठं केलं. आम्ही एक संस्थाही बनवली आहे, जी जगभरातील लोकांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या जीवनासाठी काम करते. या कामासाठी आम्ही यापुढेही एकसारखा विचार ठेवू आणि सोबतच काम करू. मात्र, आता आम्ही पती पत्नी म्हणून एकत्र राहू शकत नाही, असं आम्हाला वाटतं. आम्ही नवीन आयुष्य सुरू करत आहोत. या काळात लोकांकडून कुटुंबाला स्पेस आणि प्रायवसी मिळेल, अशी अपेक्षा आहे.’ असे ते म्हणाले आहेत.

घटस्फोटानंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांचे आर्थिक संबंध कसे असतील याविषयी फारशी माहिती समोर आली नाही. मात्र, दोघे परोपकारी कामात गुंतलेल्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेचे विश्वस्त आहेत. २००० मध्ये ही संस्था स्थापन केली. बिल आणि मेलिंडाची १९८७ मध्ये मायक्रोसॉफ्ट येथे भेट झाली. मेलिंडा प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून कंपनीत रुजू झाली. बिझिनेस डिनरच्या निमित्ताने दोघांमध्ये संवाद झाला आणि नंतर त्यांच्यात मैत्री होत गेली आणि नातेसंबंधात ते आलेत.

महत्त्वाच्या बातम्या