fbpx

विधानपरिषद निवडणूक निकाल; परभणी-हिंगोली मतदार संघातून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर होणार असून मतमोजणीला सुरवात झाली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे. तर लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर गेली आहे.

दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांचा पराभव करत बाजी मारली आहे. विप्लव बाजोरिया हे 256 मतं मिळवत विजयी झाले असून, काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांना 221 मतं मिळाली आहेत.