बिहारमध्ये गंगास्नानादरम्यान मोठी दुर्घटना ; चेंगराचेंगरीमध्ये तीन जणांचा मृत्यू

पाटणा- कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बिहारच्या बेगूसरायमध्ये गंगास्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्येतीन जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा जण जखमी झाले आहेत.

याठिकाणी काही अफवा पसरून मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. गंगाघाटावर होणारी लोकांची गर्दी पाहता प्रशासनाकडून आवश्यक सोयीसुविधा करण्यात आल्या नसल्याचा आरोप होतो आहे. ही दुर्घटना शनिवार सकाळी  घडली. या चेंगराचेंगरीत किमान १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतं. सर्वांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.