संघ मुक्त भारताचा नारा देणारे नितेशकुमार व संघ प्रमुख लवकरच एका मंचावर.

संघ मुक्त भारतचा नारा देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितेशकुमार आणि RSS प्रमुख मोहन भागवत लवकरच एका मंचावर येणार आहेत. हा राजकीय मंच नसून एका वेगळ्या कारणासाठी ते एकत्र येत आहेत.

पटना येथील आरा येथे रामानुज स्वामी महाराज यांची १०००वीं जयंती असून या निमित्ताने मोहन भागवत ४ ऑक्टोबर ला पटना येथे येणार असून बिहारचे मुख्यमंत्री नितेशकुमार देखील आरा येथे जाणार आहेत.४ ऑक्टोबरला जरी मोहन भागवत व नितेशकुमार आरा येथे १००० जयंतीसाठी एकत्र येत असले तरी ते एकमेकांना भेटणार नाहीत.

कारण मोहन भागवत ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता पटना एअरपोर्टला येणार असून तिथून ते आरा येथे कार्यक्रमासाठी रवाना होतील. नितेशकुमार सायंकाळी ४ वाजता जयंती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे नितेशकुमार व मोहन भागवत यांचा  आमना- सामना होणार नाही. मंच जरी एक असला तरी वेळा मात्र वेगवेगळ्या आहेत.

You might also like
Comments
Loading...