बिग बॉस फेम निक्की तांबोळीच्या भावाचे कोरोनामुळे निधन

मुंबई: कलर्स या टिव्ही चॅनेलवरील प्रसिद्ध रियालीटी शोच्या चाहत्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. बिग बॉस १४ ची स्पर्धक निक्की तांबोळीचा २९ वर्षीय भाऊ जतिन तांबोळी याचे मंगळवारी ४ मे रोजी निधन झाले. निक्की तांबोळीने सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. निक्कीने इंस्टाग्राम हँडलवर भावाची काही छायाचित्रे शेअर करत आपल्या भावना शब्दबद्ध केल्या.

या पोस्टमध्ये निक्कीने लिहीले आहे की,’ आम्हाला कल्पना नव्हती आज सकळी देवाने तुला बोलावलं, तु आमच्यात असो वा नसो आम्ही तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहु. तुला गमावल्याने आम्ही खुप दुखावले गेलो आहोत. तु एकटा नाही गेला आमच्या आयुष्टातील महत्वाचा तुझा भागही हिरावुन गेला आहे. देवघरी जाताना तु तुझ्या आठवणी मागे सोडुन गेला.

निक्कीच्या भावाला २० दिवसाआधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. निक्कीने दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. तर बीग बॉस १४ या रियालीटी शो मध्ये ती उपविजेती ठरली होती.

महत्वाच्या बातम्या