‘डोक्याला जबर मार बसला अन्…’ बिग बॉस फेम अर्शी खानचा गंभीर अपघात

‘डोक्याला जबर मार बसला अन्…’ बिग बॉस फेम अर्शी खानचा गंभीर अपघात

Arshi Khan

मुंबई : छोटया पडद्यावरील मालिकेतील अभिनेत्री अर्शी खान (Arshi Khan) हिच्या गाडीचा अपघात (Accident) झाला. या अपघातामुळे तिच्या डोक्याला जबर मार बसला अन्  गंभीररित्या जखमी झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बिग बॉस फेम (Big Boss) असलेल्या अर्शी खानच्या अपघातामुळे चिंता व्यक्त करत, चाहत्यांकडून लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली आहे.

दरम्यान अर्शीला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने तिच्या तब्ब्येतपासून अपघात कसा घडला याबाबतचा सर्व घटनाक्रम सांगितला. यावेळी अर्शी खानने एका मुलाखतीदरम्यान म्हणाली, ‘मी माझ्या गाडीतून बाहेर जात होती. त्यावेळी माझे काही चाहते बाहेर माझी प्रतिक्षा करत होते. ते माझ्या गाडीजवळ आले. मला माझ्या चाहत्यांना एक झलक देता यावी यासाठी मी ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करण्यास सांगितला. मात्र तेवढ्यात मागून एक दुसऱ्या गाडीने आमच्या गाडीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचा समोरील काच चक्काचूर झाली.’ असे तिने सांगितले.

तसेच या अपघातामुळे तिच्या डोक्याला जबर मार बसला. अपघातादरम्यान ती गाडीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तोपर्यंत ती बेशुद्ध झाली. ‘मला बेशुद्धीच्या अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले,’ असे अर्शी म्हणाली. सुदैवाने या अपघातात इतर कोणालाही दुखापत झाली नाही, यासाठी देवाचे आभार मानते’ असं म्हणत चाहत्यांचे देखील आभार मानले. अपघातानंतर ती मुंबईला रवाना झाली असून पुढील काही दिवस डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ती पुन्हा एकदा शूटींगला सुरुवात करणार आहे. हा अपघात दिल्लीतील (Delhi) शिवालिक रोडवरील मालविया नगरमध्ये झाला असून सध्या या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु आहे.

अभिनेत्री अर्शी खानचे ग्लॅमरस फोटो.

 

महत्वाच्या बातम्या