बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलन पेटलं

टीम महाराष्ट्र देशा- एका 14 महिन्यांच्या बालिकेवर बिहारी नराधमाने बलात्कार केल्याच्या संतापजनक घटनेनंतर गुजरातमध्ये हिंसाचाराचा प्रचंड भडका उडाला आहे. गुजरातमधून ‘यूपी-बिहारी भगाओ’ अशी मोहीमच सुरू झाली असून दिसेल तेथे उत्तर भारतीयांवर हल्ले, त्यांच्या घरांची तोडफोड सुरू आहे. या हिंसाचारामुळे गुजरातमध्ये प्रचंड तणाव असून शेकडो उत्तरभारतीयांनी राज्यातून पळ काढला आहे.

गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या ५ जिल्ह्यांमधून गुजरात पोलिसांनी तब्बल १८० जणांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका १४ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर विषय पेट घेण्याआधी पोलिसांनी या प्रकरणात रविंद्र साहू या आरोपीला अटक केली आहे. रविंद्र साहू हा मूळचा बिहारचा आहे हे समोर येताच, त्याच्या अटकेनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांवर हिंसक हल्ले होण्यास सुरुवात झाले.

राष्ट्रपतींकडून सन्मान झालेल्या CBSE टॉपरवर सामूहिक बलात्कार

पुण्यात तरुणीवर सामुहिक बलात्कार; दोघांना अटक