लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पुण्यात मोठी ‘वाहतूककोंडी’!

blank

पुणे: देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासुनच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा आकडा हा वाढतच होता. तर कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (दि. १४ जुलै) पासून शहरात कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. एकूण १० दिवसांच्या असणाऱ्या या कडक लॉकडाऊनमध्ये पहिल्याच दिवशी मात्र शहरातील मुख्य भागांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील शिवाजीनगर येथील सिग्नलला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. तर एकबाजूला शहरातील काही रस्ते ओस पडल्याचे दिसून येत होते.

शहरातील अनेक मुख्य भागात जाणारे रस्ते हे शिवाजीनगर परिसरातून जात असल्याने येथील सिग्नलला मोठ्या संख्येने वाहने आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. लॉकडाऊनच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद आहेत. मात्र, औद्योगिक वसाहती, त्याचबरोबर कमी लोकसंख्येत सरकारी कार्यालय सुरु आहेत. त्यामुळे कामगार नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडले आणि वाहतूक कोंडी झाली.

आता भाजपाने एकदा स्वतंत्र लढवूनच बघाव, जयंत पाटलांच जोरदार प्रत्युत्तर

शिवाजीनगर परिसरात चेक पोस्ट असून पोलीस प्रशासन प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करत आहे. अशा स्थितीत अनेक कामगार नेहमीप्रमाणे कामावर बाहेर पडले आणि शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. सिग्नलला वाहतूक कोंडी झाल्याने फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

धाकधुक वाढणार ! CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

पुण्यात एकीकडे रस्ते निर्मनुष्य झालेत आणि दुसऱ्या बाजूला नागरीकांचा रस्त्यावर अक्षरशः लोंढा आलाय. अशी विरोधात्मक परिस्थिती असताना कोरोनाची साखळी ब्रेक कशी होईल, असा प्रश्न उपस्थित होतोय. तर या लॉकडाऊनमध्ये आयटी कंपन्या, एमआयडीसीतील कंपन्या या सुरु असणार आहेत. दरम्यान, “कंपन्यांच्या एचआर विभाग प्रमुखाने कंपनीच्या लेटरहेडवर वाहन परवाना द्यावा. या परवान्यांची माहिती एचआरने संबंधित पोलीस आयुक्त आणि पोलीस स्टेशन प्रभारी यांना द्यावी. कामगार-अधिकाऱ्यांनी कंपनीने दिलेला वाहन परवाना सोबत ठेवणे बंधनकारक असेल”, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.

‘रूग्णालयाबाहेर झालेले 600 मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेने जाहीर केलेले नाहीत’