पंतप्रधानांच्या जीवाला धोका; एसपीजीकडून सुरक्षिततेत वाढ

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल गृहमंत्रालयाने दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूका आणि त्याआधी होणाऱ्या प्रचारादरम्यान मोदींवर हल्ला केला जाऊ शकतो, अशी शक्यता गृहमंत्रालयाने वर्तवली आहे. त्यामुळं आता पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांना असलेला धोका लक्षात घेऊन एसपीजीनेही आपल्या सुरक्षिततेत वाढ केली आहे. त्यामुळे आता अधिकारी आणि मंत्र्यांनाही एसपीजीच्या परवानगिशीवाय पंतप्रधानांच्या जवळ जाता येणार नाही. एसपीजी म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप हा खास पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आला आहे.

निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधानांनी रोड शो करणं टाळावं असा सल्लाही पंतप्रधानांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहून पंतप्रधानांच्या दौऱ्याच्यावेळी सुरक्षेची काळजी घेण्याची सूचनादेखील देण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...