fbpx

CRPFच्या जवानांवर आत्मघातकी हल्ला,5 जवान शहीद

श्रीनगर : अनंतनाग जवळ CRPF जवानांवर अतिरेक्यांनी पुन्हा आत्मघातकी हल्ला केलाय. यात 5 जवान शहीद झाले आहेत. 2 जवान जखमी झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. सध्या सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून आणखी कुमक मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

एका दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांनी बी / ११६ या बटलीयनवर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकावर हल्ला केला. ज्यामध्ये सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले. पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा आत्मघाती हल्ला मानला जात आहे. पेट्रोलिंगसाठी जवानांचं वाहन जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला.हल्ल्यानंतर जावानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यात एक दहशतवादी ठार झाला.