कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश

टीम महाराष्ट्र देशा – करोना जागतिक महामारीने थैमान घातल आहे . कोरोनाचा देशात फैलाव होऊ नये यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. करोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केलं आहे. राज्य सरकारही यावर आपल्या स्थरावर कठोर पावलं उचलत आहे.

आता करोनाविरोधातील लढ्याचा एक भाग म्हणून भारतीय शास्त्रज्ञांनी करोना विषाणूची माइक्रोस्कोपिक चित्र जगासमोर आणलं आहे. . ३० जानेवारी रोजी केरळमध्ये भारतातील करोना पहिला रुग्ण सापडला होता. भारतीय शास्त्रज्ञांनी या रुग्णाच्या घशाचा द्रव घेतला होता. त्यावरुन भारतीय शास्त्रज्ञांकडून संशोधन कऱण्यात आलं.

ही घडामोड म्हणजे करोनाविरोधातील लढ्यात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. दरम्यान करोना विषाणूंचं माइक्रोस्कोपिक चित्र शास्त्रज्ञांकडून प्रकाशित करण्यात आलं आहे.

हेही पहा –