‘सुपर संभाजीनगर’ बोर्डवरून नवीन सीईओचे मोठ वक्तव्य

औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सीईओ पदाचा तिढा आखेर सुटला आहे. केंद्र शासनाच्या शिफारशीनुसार राज्य शासनाने मनोहरे यांची औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओपदी नियुक्ती केली आहे. मनोहरे यांच्या नियुक्तीवर मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आक्षेप घेत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बदलीस स्थगिती दिली असल्याचे सांगितले होते. तरीही असतादेखील मनोहरे यांनी सोमवारी पदभार घेतला. त्यावर त्यांनी ‘सुपर संभाजीनगर’ डिजिटल बोर्डावरुन ते मोठे वक्तव्य करत म्हणाले की ‘सुपर संभाजीनगर’ बोर्ड लावणाऱ्यांना शोधून काढू असे म्हणाले.

मनोहरे यांनी मंगळवारी स्मार्ट सिटी अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, स्मार्ट सिटी अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाचे गेल्या चार वर्षांतील अंतर्गत लेखापरीक्षण केले आहे. मात्र, ते नागपूर येथील महालेखाकारांमार्फत होणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटी कार्यालयाने यापुर्वी ऑडिटसंदर्भात पत्रे पाठवली, पण, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने नव्याने आपण पाठपुरावा करणार असे मनोहरे यांनी सांगितले. शहरात लावलेल्या ‘सुपर संभाजीनगर’ डिजिटल बोर्डावरून शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात बोर्ड लावण्यासाठी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने परवानगी दिली आहे का, यासंदर्भात तपासणी करणार असे त्यांनी सांगितले.

मनोहरे यांच्या नियुक्तीला काही राजकीय नेत्यांचा विरोध होता. या विरोधामुळेच मनोहरे हे ‘सुपर संभाजीनगर’ हा बोर्ड लावणाऱ्यांना शोधून काढू असे वक्तव्य केले. यावर स्थानिक नेते काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी त्यांनी शहरात सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. अनेक प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. काही प्रकल्पांचे प्रस्ताव तयार आहेत. शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पांना संचालक मंडळाची मंजुरी घेऊन ती कामे हाती घेतली जातील, असे मनोहरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या