हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं- भगतसिंह कोश्यारी

हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं- भगतसिंह कोश्यारी

bhagatsingh koshyari

यवतमाळ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagatsingh Koshyari) हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. तसेच आता पुन्हा एकदा ते यवतमाळ येथील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमात मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं, अशी भूमिका राज्यापालांनी घेतली.

जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इंग्रजीमध्ये करण्यात येणाऱ्या सूत्रसंचालनावरुन राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलत असतांना कोश्यारी म्हणाले की,’हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीतचं सूत्रसंचालन व्हायला पाहिजे.’ तसेच मराठी भाषा ही मातृभषा आहे याचं भान राखलं पाहिजे, राज्यात सर्वत्र मराठी भाषा अनिवार्य असली पाहिजे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे काही जुन्या आठवणी सांगत ते म्हणाले की,’महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक शैक्षणिक संस्थांच्या उपक्रमांमध्ये बोलाविण्यात यायचे. त्यावेळी एका कार्यक्रमात सूत्रसंचालक इंग्रजीमध्ये बोलत होता. त्या व्यक्तीला हटकत तुला मराठी ठाऊक नाही का? असा सवाल केल्याचे राज्यपालांनी सांगितले.त्यावेळीच त्याला हा महाराष्ट्र आहे, इथं मराठीमध्ये सूत्रसंचालन केलं पाहिजे, प्रमुख पाहुणा इतर राज्यातील असला किंवा परदेशातील असला आणि त्याला मराठी हिंदी समजत नसेल तर इंग्रजीचा वापर करण्यास हरकत नाही,’ असे राज्यपाल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: