राज्य सरकारला ‘मोठा धक्का’ ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारमधील बरेच लोकं एक महत्वाचा निर्णय घ्यायला.खूप तळमळीने प्रयत्न करत होते.पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अध्यादेश काढायला दिलेला नकार आणि त्यानंतर लगेचच झालेली ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा.यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारनं जो थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला होता. त्याच पद्धतीने राज्यातील १९ जिल्ह्यातील सुमारे १५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अधिसूचना काढली आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला थेट सरपंच पदाचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारनं 28 जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत रद्द केला. मात्र त्यानंतर जुन्या पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य सरपंच निवडतील या अध्यादेशावर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी ही करण्यास नकार दिला होता.

Loading...

थेट सरपंच पदाची निवडणूक रद्द करून त्याऐवजी अप्रत्यक्ष निवडणुकीसाठी राज्य सरकार अध्यादेश काढण्यासाठी का घाई करत होतं हे आता समोर आलंय. कारण राज्य निवडणूक आयोगानं आता राज्यातील १९ जिल्ह्यातील सुमारे १५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अधिसूचना काढली आहे. २९ मार्चला मतदान तर ३० मार्च मतमोजणी होणार आहे. पण आता सरपंचपदाच्या निवडणुका जुन्या पद्धतीने म्हणजेच थेट लोकांमधून होणार असल्याने तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जातोय.

आता मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्यणानुसार सरकारला निवडणुका घ्यायच्या असतील तर सरकारला विधिमंडळात याबद्दलचं विधेयक मांडूनच तो निर्णय लागू करावा लागणार आहे. पण यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये काही मुद्यांवर मतभेद आहेत.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं