Share

IND vs SL | ऋषभ पंतला मोठा धक्का! टी-20 मध्ये टीम इंडियातून बाहेर?

IND vs SL | मुंबई: पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 (T-20) आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI) खेळली जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. यामध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान भारतीय संघामध्ये मोठे बदल दिसतील. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) ला यंदाच्या टी-20 फॉरमॅटमधील खराब कामगिरीचा फटका बसू शकतो. ऋषभ पंतला या सामन्यांमध्ये भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तर, भारतीय संघामध्ये संजू सॅमसन आणि ईशान किशनला जास्तीत जास्त संधी मिळू शकते.

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) टी-20 मध्ये ऋषभ पंत टीम इंडियातून बाहेर?

बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेमध्ये ऋषभ पंतने चांगली कामगिरी केली होती. मात्र, आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये ऋषभ पंतने टी-20 फॉर्मेटमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. त्यामुळे विश्वचषकातील अपयशानंतर बीसीसीआयने काही कठोर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान, ऋषभ पंतला संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्या जाण्याची शक्यता आहे.

ऋषभ पंतला आत्तापर्यंत 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये त्याने 987 धावा आपल्या नावावर केल्या आहे. या धावा त्याने 22 च्या सरासरीने केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट केवळ 126 होता. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये फक्त तीन अर्धशतके केली आहेत.

ऋषभ पंतच्या खराब फॉर्मनंतरही त्याला संधी दिल्याने बीसीसीआयला टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, आता बीसीसीआय त्याच्या बाबतीत काही कठोर निर्णय घेणार आहे. बीसीसीआय संघामध्ये संजू सॅमसंग आणि ईशान किशनला जास्तीत जास्त संधी देणार आहे. कारण हे दोन्ही खेळाडू सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या

IND vs SL | मुंबई: पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 (T-20) आणि तीन सामन्यांची …

पुढे वाचा

Cricket Sports