कोव्हॅक्सिनला मोठा धक्का ! आपात्कालीन वापरासाठी अमेरिकेचा नकार

covaccine

नवी दिल्ली : भारत बायोटेकनं बनवलेल्या कोवॅक्सिन लसीच्या आतप्कालीन वापराला मंजुरी देण्याचा प्रस्ताव अमेरिकन अन्न व औषध प्रशासनानं (FDA)फेटाळला आहे. भारत बायोटेकची अमेरिकतील सहकारी कंपनी ओक्यूजेन आएनसीनं लसीच्या वापराला परवानगी मिळणवण्यासाठी बायोलॉजिक्स लायसन्स अ‌ॅप्लिकेशन करणार असल्याच सांगितलं आहे. ओक्यूजेन आयएनसी ही भारत बायोटेकची अमेरिकेतील सहकारी कंपनी आहे.

भारत बायोटेकने अमेरिकेतील भागीदार ऑक्यूझेन कंपनीच्या माध्यमातून ‘एफडीए’कडे कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली होती. मात्र, आता ‘एफडीए’ने मंजुरी देण्यास नकार दिला आहे. ‘एफडीए’ कोव्हॅक्सिन लसीचे आणखी एकदा परीक्षण करण्यास सांगितले आहे. आता यानंतर अमेरिकेकडे पूर्ण वापरासाठी मंजुरी मागितली जाईल, असे ऑक्युझेनकडून सांगण्यात आले आहे.

आपत्कालीन वापराच्या परवानगीचा अर्ज नामंजूर केल्यानंतर एफडीएनं कंपनीला मार्ग सुचवला आहे. ओक्यूजेन आयएनसी कंपनीनं सांगितलं की कोवॅक्सिन लसीच्या वापराला परवानगी मिळावी म्हणून एफडीएच्या सल्ल्यानुसार अतिरिक्त आकडेवारीसह कंपनी बीएलए अर्ज दाखल करेल. एफडीएकडून बीएलए अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे त्यानुसार लसींच्या वापराला मंजुरी दिली जाते. त्यामुळे अमेरिकेतील कोवॅक्सिन लसीच्या मंजुरीसाठी अजून वेळ जाऊ शकतो.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आरोग्य विभागाचे मुख्य सल्लागार डॉ. फाऊची यांनी कोवॅक्सीन प्रभावी असल्याचे म्हटले होते. हिंदुस्थानने नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेकडे कॉवॅक्सिनला मान्यता मिळण्यासाठीहीए अर्ज केला होता. परंतु अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला खीळ बसू शकते. भारत बायोटेकची अमेरिकेतील भागीदारी कंपनी ओक्युजेनने अमेरिकेत कोवॅक्सीनला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळवण्यासाठी विनंती केली होती.

महत्वाच्या बातम्या 

IMP