गौतम गंभीरला मिळालेल्या धमकीबाबत पोलिसांचा मोठा खुलासा

गौतम गंभीरला मिळालेल्या धमकीबाबत पोलिसांचा मोठा खुलासा

गौतम गंभीर

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती काल समोर आली होती. या प्रकरणानंतर गौतम गंभीर यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली. त्यानंतर आता या प्रकारणी पोलीसांकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

गौतम गंभीरला पहिला ईमेल मंगळवारी रात्री आला ज्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र बुधवारी त्याला पुन्हा ‘काल तुला मारायचे होते, वाचलास, काश्मीरपासून दूर राहा’, असा ईमेल आला. या मेलसोबत गंभीरच्या घराबाहेरचा एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. ही धमकी आयएसआयएस काश्मीरने दिल्याचा गौतम गंभीरने आरोप केला आहे.

त्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुगलकडून (Google ) माहिती मागवण्यात आला होता. त्यानुसार, गौतम गंभीरला धमकीचा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. पाकिस्तानचा आयपी अ‍ॅड्रेसही सापडला आहे. ज्या सिस्टीमद्वारे हा मेल पाठवला गेला त्याचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानमध्ये सापडला आहे.

दरम्यान, २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी आलेल्या एका ई-मेलमध्ये खासदार गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून तपास करावा, असं गंभीरने दिलेल्या पत्रात सांगण्यात आले होते. त्यानुसार आता पुढील तपास पोलीस करत असून याबाबतचा हा खुलासा करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या