मोठा खुलासा! 2 महिन्यापेक्षा जास्त काळ संजय राऊतांचा फोन टॅप; चौकशी सुरू

मुंबई : संजय राऊतांचा फोन 2 टप्यात टॅप करण्यात आला अशी माहिती मिळत आहे. सत्ता स्थापनेच्यावेळी राऊतांचा फोन टॅप झाला असल्याचे बोलले जात आहे. खंडसेंचा फोन 67 दिवस तर संजय राऊतांचा फोन दोन टप्यात टॅप करण्यात आला.

एकनाथ खडसे आणि संजय राऊत या दोघांचाही जबाब यावेळी नोंदविण्यात आला आहे. महाविकास आघाडी बनण्याच्या अगोदरच्या काळामध्ये हा फोन टॅपिंग प्रकार घडलेला होता. फोनन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणी 2 मार्च रोजी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता.

महत्वाच्या बातम्या –

किरीट सोमय्या गुजरातमध्ये आहेत: एका वृत्तवाहिनीने केला खुलासा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संजय राठोडांना हवंय पुन्हा मंत्रिपद
पाकिस्तानच्या रस्त्यांवर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा!
यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर…”
“शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष करावं म्हणजे…”, यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्याला शिवसेनेचे प्रत्युत्तर