पंकजा मुंडेंच्या सभांना मध्य प्रदेशात मोठा प्रतिसाद

टीम महाराष्ट्र देशा- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सध्या राजकारण तापले आहे. मतदारांचा कौल आपल्याच मिळावा यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. अनेक स्टार प्रचारक सभा गाजवत असून महाराष्ट्रातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या प्रभावी भाषणाने मध्य प्रदेशातील जनतेचीही मने जिंकली.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समवेतच्या महू येथील सभेसह अन्य तीन ठिकाणी झालेल्या त्यांच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे शनिवारी मुंबईहून इंदौरला रवाना झाल्या. सकाळी विमानतळावर पोहोचताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर उज्जैन येथे दक्षिण विधानसभा मतदारसंघ, महू, इंदौर विधानसभा क्षेत्र क्र. 2, रामनगर आणि विधानसभा क्षेत्र क्र. 3 शिवाजीनगर भागात भाजपा उमेदवारांसाठी त्यांनी सभा घेतल्या. या सर्व ठिकाणी मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. उज्जैन येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर महू येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समवेत त्यांच्या सभा झाल्या.

माझ्या टेबलावर फाईल असती तर मराठा समाजाला कधीच आरक्षण दिलं असतं : पंकजा मुंडे