नाना पाटेकरांना मोठा दिलासा, तनुश्री दत्ताने सादर केलेले पुरावे कमकुवत

टीम महाराष्ट्र देशा : लैंगिक शोषणाचे आरोप असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या विरोधात # me too अंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप करत ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावर आता ओशिवरा पोलिसांनी कोर्टात बी समरी अहवाल सादर केला आहे. मात्र या अहवालानुसार नाना पाटेकर यांच्याविरोधात असणारे पुरावे हे कमकुवत असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांच्यासाठी हे दिलासा देणारे वृत्त आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी भारतात #me too मोहिमेने चांगलाच जोर पकडला होता. या मोहिमेमध्ये जास्त सहभाग हा बॉलीवूड अभिनेत्रींचा होता. त्यामुळे बॉलीवूडमधील अनेक पडद्यामागची अश्लील प्रकरण उघडकीस आली. तर अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर देखील अश्लील वर्तनाचे आरोप केले होते. तसेच ओशिवरा पोलीस ठाण्यात १० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल करताना सादर करण्यात आलेले पुरावे हे कमकुवत असल्याच समोर आले आहे.

Loading...

दरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही महिन्यांपूर्वी #MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठा गदारोळ झाला होता. या गाण्यातील एका दृश्यावर तनुश्रीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने या चित्रपटातून माघार देखील घेतली होती. त्यानंतर ती परदेशात वास्तव्यास गेली होती. गेल्या वर्षी ती परदेशातून भारतात आली. त्यानंतर तिने #MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला