bmc-budget-2019 मुंबईकरांना मोठा दिलासा; बजेटमध्ये करवाढ नाही!

टीम महाराष्ट्र देशा- केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पा पाठोपाठ मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी आज २०१९ -२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे मेहता यांनी 30 हजार 692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पाची प्रत सादर केली. या अर्थसंकल्पात विकासकामांसाठी 30 हजार 692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई अर्थसंकल्पात केलेल्या महत्वाच्या तरतुदी

 • माहिती तंत्रज्ञान विभागाकरिता 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये भांडवली खर्चाकरिता 173.23 कोटी आणि महसूली खर्चाकरिता 202.44 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
 • कोस्टल रोड – 1600.07 कोटी, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता 100 कोटी , मुंबईतील 370 कि.मी.रस्त्यांची सुधारण्यासाठी 1520.09 कोटींची तरतूद.
 • पुलांच्या दुरूस्तीसाठी 108 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
 • बेस्ट : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतीच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी. तर बेस्टमधील सुधारणांसाठी ३४.१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
 • मालाड , महालक्ष्मी आणि देवनार येथे पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनीची सुविधा उपलब्ध होणार त्याकरिता ११.५० कोटींची तरतुद करण्यात आली आहे.
 • पशु वैद्यकीय आरोग्य खात्याकरिता गेल्यावर्षी १३.३० – कोटींचा निधी दिला होता तर यंदा हा निधी ३५.६० कोटी एवढा देण्यात आला आहे.
 • मुंबईतील वाहनांचे नियमन व व्यवस्थापनासाठी वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात वाहनतळ प्राधिकरणासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
 • मुलुंड क्षेपणभूमी बंद करण्यासाठी ४३ कोटी रुपये.
 • राणी बाग प्राणी संग्रहालयाचा विस्तार करण्यासाठी ११० कोटी रुपयांची तरतूद.
 • महापौरांना नवं घर मिळणार, शिवाजी पार्कमध्ये निवासस्थान उभारण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद.
 • सध्याच्या करांमध्ये कोणतीही वाढ नाही. तसंच नवे कर प्रस्तावित नाहीत.
 • आरोग्य विभागासाठी ३६०१ कोटी रुपयांची तरतूद.
 • तानसा मुख्य जलवाहिन्यांलगत सायकल मार्गिकेसाठी १२० कोटी रुपयांची तरतूद.