हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना मोठा दिलासा

hardik-pandya

टीम महाराष्ट्र देशा- अष्टपैलू हार्दिक पंड्या तसेच लोकेश राहुलला बीसीसीआयच्या प्रशासक समितीकडून दिलासा मिळाला आहे. दोघांवरील निलंबनाची कारवाई तूर्त मागे घेण्यात आली असून पंड्याला आता न्यूझीलंड दौऱ्यावर धाडण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी पंड्या आणि राहुल यांना मदत केल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी खन्ना यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी पंड्या आणि राहुल यांच्यावरील निलंबन मागे घ्यावे, त्यांना संघाबरोबर न्यूझीलंडमध्ये पाठवण्यात यावे, असे लिहिले होते.

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘कॉफी विथ करण’ मध्ये पंड्या आणि के एल राहुलला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी हार्दिक पंड्याने महिलांविषयी वादग्रस्त विधान केले होते. यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. त्यानंतर या दोघांवर प्रत्येकी दोन वन डे सामन्यांची बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस क्रिकेट प्रशासक समिती म्हणजेच सीओएचे अध्यक्ष विनोद रॉय यांनी केली होती.